सोमनपल्ली येथे स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी
– बेलदार समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम
The गडविश्व
चामोर्शी, दि. ११ : तालुक्यातील सोमनपल्ली येथे शनिवार १० जानेवारी २०२६ रोजी स्वर्गीय कर्मवीर ऊर्फ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब कन्नमवार यांची १२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त बेलदार समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन मा. सा. कन्नमवार सभागृह, सोमनपल्ली येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयड मेटल्स अँड एनर्जी लि., कोनसरीचे व्हॉईस प्रेसिडेंट कर्नल महापात्रा यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच निळकंठ पाटील निखाडे हे सहउद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजु कात्रटवार (प्रांतीय उपाध्यक्ष, बेलदार समाज संघटना महाराष्ट्र राज्य, गडचिरोली) विराजमान होते, तर उपाध्यक्ष म्हणून आकाश विद्यालय, जयरामपूरचे संस्थापक बालमवार उपस्थित होते.
दीपप्रज्वलन माजी सरपंच आनंदराव पिदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिजीत बंडावार (कोनसरी), ज्येष्ठ नागरिक नागोबाजी पेदापल्लीवार (कोनसरी), पोलीस पाटील मंगलाताई भेंडारे (सोमनपल्ली), हरिभाऊ नेवारे, संदीप नेवारे तसेच सौ. सुनीताताई मेकर्तीवार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेलदार समाज संस्था, सोमनपल्लीचे अध्यक्ष अशोकभाऊ गाजुलवार यांनी केले. संचालन संस्थेचे सचिव टिळक पेशट्टीवार यांनी केले, तर आभार अशोक पेद्दीवार यांनी मानले.
यावेळी गुणवंत विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा मधुकर पेदापल्लीवार (चामोर्शी), तुकाराम पेद्दीवार व मोरेश्वर पेदापल्लीवार यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात रंगत भरली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, समाजबांधव व युवक उपस्थित राहिल्याने कार्यक्रम यशस्वी ठरला.














