चोप येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या डिजिटल वाटचालीत योगदान देणाऱ्या तिलक गायकवाड यांचा सत्कार

11

चोप येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या डिजिटल वाटचालीत योगदान देणाऱ्या तिलक गायकवाड यांचा सत्कार
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. २० : सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या डिजिटल वाटचालीत तांत्रिक योगदान देणारे चोप येथील तिलक गायकवाड यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
तिलक गायकवाड यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, नवरात्रोत्सवाच्या काळात ते आवर्जून गावात येऊन मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. मंडळासाठी त्यांनी स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे मंडळाची माहिती, ऑनलाइन देणगीची सुविधा तसेच विविध कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय मंडळाचे Instagram, Facebook आणि YouTube हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही ते सांभाळतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक उत्सवाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग गावातील सार्वजनिक उपक्रमांसाठी करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या योगदानाबद्दल पंचायत समिती सभापती मोहन पाटील गायकवाड, माजी उपसभापती गोपाल उईके, सरपंच नितीन लाडे, डॉ. राकेश चाहांदे, सुभाष तितिरमारे, कमलेश बारस्कर आणि गौरव नागपूरकर यांच्या उपस्थितीत तिलक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here