आविका रांगी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना दिलासा

88

आविका रांगी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना दिलासा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.१३ : धानोरा तालुक्यातील रांगी (आविका) येथे शासकीय आधारभूत किमतीनुसार धान खरेदी केंद्राचा शुभारंभ सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आला. आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, रांगी यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन सभापती जगदीश महादेव कन्नाके यांच्या हस्ते पार पडले.
परिसरातील शेतकऱ्यांचे धान काढणी व मळणी पूर्ण झाली असून, खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धान्य घरीच साठवून ठेवावे लागत होते. साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान, सुरक्षिततेची अडचण आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता धान खरेदी केंद्र सुरू होणे अत्यावश्यक होते. अखेर केंद्राचा शुभारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, आता धान विक्री प्रक्रिया सुलभ होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी बाजार समिती, गडचिरोलीचे अध्यक्ष शशिकांत साळवे, उपसभापती केशव डोमाजी मेश्राम उपस्थित होते. तसेच संस्थेचे सदस्य दिलदारखान पठाण, लालाजी बावजी पदा, नितेश सदाराम जांगी, रूपचंद श्रीराम गेडाम, विलास दादाजी भोयर, रवींद्र मनोहर हलामी, घनश्याम खेवले, सौ. प्रेमीला रामाजी काटेंगे, ऑपरेटर अनिकेत नामदेव बैस, शेतकरी दामोदर देवाजी जुवारे, विठ्ठल शिवराम चापले, नामदेव बैस, देवराव कुणघाटकर, मंगेश कोराम व संस्थेचे व्यवस्थापक सुरेश हलामी यांची उपस्थिती होती.
धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शासकीय दराने धान विक्रीची सोय उपलब्ध झाली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here