सेवा संकल्प अभियानातून २२ बालकांची ROP तपासणी; एका बालकावर यशस्वी लेझर शस्त्रक्रिया

6

सेवा संकल्प अभियानातून २२ बालकांची ROP तपासणी; एका बालकावर यशस्वी लेझर शस्त्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : मुदतपूर्व जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बालकांच्या दृष्टीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC), गडचिरोली येथे २२ बालकांची ROP (Retinopathy of Prematurity) तपासणी करण्यात आली. यामध्ये एका बालकाला लेझर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे आढळून आले. त्यानुसार या बालकावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.
मुदतपूर्व जन्मलेली, कमी वजनाची तसेच नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (SNCU) उपचार घेतलेली बालके ROP या डोळ्यांच्या आजाराच्या जोखमीमध्ये असतात. या आजाराचे वेळेत निदान न झाल्यास बालकांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा बालकांची नियमित नेत्रतपासणी आणि आवश्यक उपचार करणे महत्त्वाचे ठरते.
या तपासणी व उपचारासाठी नागपूर येथील माधव नेत्रालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. रक्षिता केने (एम.एस. ऑप्थॅल्मॉलॉजी), संदीप गावतुरे आणि त्यांच्या चमूने सहकार्य केले.

ROP आजाराचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळाल्यास बालकांच्या दृष्टीचे नुकसान टाळण्यास मदत होते. सेवा संकल्प अभियानांतर्गत DEIC, गडचिरोलीमार्फत अतिजोखमीच्या बालकांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here