सोनसरी–उराडी मार्गावर काळाचा घाला ; दूचाकी दगडावर आदळून चालक जागीच ठार

145

सोनसरी–उराडी मार्गावर काळाचा घाला ; दूचाकी दगडावर आदळून चालक जागीच ठार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ११ : सोनसरी–उराडी मार्गावरील वळणावर दूचाकी अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेल्या दगडावर, तसेच त्यानंतर झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दूचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज ११ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. रतीराम घनचू हलामी (वय ५०, रा. येगंलखेडा) असे मृतकाचे नाव आहे.
येगंलखेडा येथील आविका संस्थेचे संचालक असलेले रतीराम हलामी हे सकाळी स्वतःच्या दूचाकीने (क्रमांक एमएच ३३ एजी ९६८६) काही कामानिमित्त कूलकुली, चवेला येथे गेले होते. काम आटोपून उराडी–सोनसरी मार्गे ते एकटेच गावाकडे परतत असताना वळणावर त्यांची दूचाकी अचानक अनियंत्रित झाली. दूचाकी प्रथम रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळली आणि त्यानंतर झाडावर जोरदार धडकली. या धडकेत हलामी हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठविण्यात आला. रतीराम हलामी हे मनमिळावू व सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. या अपघातामुळे येगंलखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here