धानोरा-रांगी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; गर्भवती महिलेसह तिघे जखमी

10

धानोरा-रांगी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; गर्भवती महिलेसह तिघे जखमी
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि.२१ : धानोरा-रांगी मार्गावरील मोहली गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन पाच महिन्यांची गर्भवती महिलेसह तिघे जखमी झाले. ही घटना २० ऑक्टोबर रोजी गावाजवळील वळणावर घडली.
कविदास दादाजी लेनगुरे (४०, रा. मोहली), दर्शना सुधाकर पोटावी (३०) आणि सुधाकर सनकू पोटावी (४०, दोघेही रा. जांभळी) अशी जखमींची नावे आहेत. दर्शना या पाच महिन्यांच्या गर्भवती असून, सुधाकर आणि दर्शना हे पती-पत्नी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कविदास लेनगुरे हे मोहली येथून धानोऱ्याकडे दुचाकीने जात होते. त्याचवेळी सुधाकर पोटावी आणि दर्शना पोटावी हे धानोऱ्याकडून मोहलीच्या दिशेने जात असताना मोहली गावाजवळील वळणावर दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली.
या अपघातात तिघांच्याही चेहरा, छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here