गडचिरोलीत ७६ अतिजोखमीच्या बालकांची कानांची तपासणी

10

गडचिरोलीत ७६ अतिजोखमीच्या बालकांची कानांची तपासणी
– श्रवणदोषाचे लवकर निदान करण्यासाठी पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात (DEIC) SNCU मध्ये उपचार घेतलेल्या ७६ अतिजोखमीच्या बालकांची प्राथमिक श्रवण तपासणी करण्यात आली. यामध्ये कमी वजनाने जन्मलेल्या आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांचा समावेश होता.
या बालकांची OAE (Otoacoustic Emissions) या पद्धतीद्वारे कानांची व ऐकण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यात आली. कमी वजनाने किंवा मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये श्रवणदोषाचा धोका अधिक असू शकतो. त्यामुळे अशा बालकांची वेळेत तपासणी करून संभाव्य श्रवणदोषाचे निदान करणे महत्त्वाचे ठरते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे श्रवणदोषाचे लवकर निदान करून आवश्यकतेनुसार पुढील तपासणी व उपचार करणे शक्य होणार आहे. बालकांच्या श्रवणक्षमतेसह सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here