गडचिरोली : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आरोही चव्हाण, सार्थक गेडाम अजिंक्य

36

गडचिरोली : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आरोही चव्हाण, सार्थक गेडाम अजिंक्य
– २५० खेळाडूंचा सहभाग; ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा किताब पटकावला
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली जिल्हा ॲम्युचर क्रीडा कराटे-डो असोसिएशनच्या वतीने आयोजित १७ व्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मुलींमधून आरोही चव्हाण, तर मुलांमधून सार्थक गेडाम यांनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा किताब पटकावला. १८ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे २५० खेळाडूंनी सहभाग घेतला.
पाच ते २५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी विविध गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत स्पर्धेत चुरस निर्माण केली. स्पर्धेतील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा किताब विशेष आकर्षण ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन प्रशांत वाघरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओमप्रकाश संग्रामे, गोविंद सारडा, ऋषिकांत पापडकर, अविनाश वरगंटीवार, रुपराज वाकोडे, लिलाधर भरडकर आणि कपिल बागडे उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी एसजीएफआय राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंनाही विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट लढवय्या खेळाडू म्हणून आर्यन बावणे, क्रिश लोणारे, मैथिली जुवारे आणि पार्थ गेडाम यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर कृष्णा काबरा याला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील कराटेपटूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here