पदवीधर मतदारांनो, मोबाईलवर एका क्लिकमध्ये तपासा मतदार यादीतील नाव

3

पदवीधर मतदारांनो, मोबाईलवर एका क्लिकमध्ये तपासा मतदार यादीतील नाव
– उद्या मतदान; घरबसल्या जाणून घ्या मतदान केंद्राचा पत्ता
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, आपले नाव मतदार यादीत आहे का आणि मतदान केंद्र नेमके कुठे आहे, हे अद्याप माहीत नसलेल्या पदवीधर मतदारांना घरबसल्या मोबाईलवर ही माहिती तपासता येणार आहे. निवडणूक विभागाने मतदार यादी ऑनलाइन उपलब्ध करून दिली असून, पात्र मतदारांनी मतदानापूर्वी आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे तपासा मतदार यादीतील नाव

मतदारांना खालील सोप्या प्रक्रियेद्वारे आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती मिळवता येईल.

१. मोबाईलमधील Google ब्राउझर उघडून Maha Voter Search असे सर्च करा.
२. त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक विभागाच्या अधिकृत “मतदार शोध संकेतस्थळाला” (https://mahaelection.gov.in/Citizen/Search) भेट द्या.
३. संकेतस्थळावरील Constituency या पर्यायामध्ये Graduates’ हा पर्याय निवडा.
४. Search By या पर्यायात District + Taluka + Name निवडा.
५. District मध्ये आपला जिल्हा निवडा. Taluka मध्ये तालुका निवडू शकता किंवा पर्याय उपलब्ध असल्यास All Talukas निवडा.
६. First Name मध्ये आपले नाव आणि Last Name मध्ये आडनाव भरा.
७. खाली दिलेला Captcha Code अचूक टाकून Search बटणावर क्लिक करा.

सर्च करताच मिळेल मतदान केंद्राचा पत्ता

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्क्रीनवर मतदाराचे नाव, मतदान केंद्राचा सविस्तर पत्ता, Part Number आणि Serial Number अशी माहिती दिसेल. त्यामुळे मतदानाच्या दिवशी केंद्र शोधण्यासाठी होणारी धावपळ टाळता येईल.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव तपासून उद्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #eci

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here