– नागरिकांना ठरतोय धोकादायक
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. ११ : तालुका मुख्यालयातील सती नदीवरील रपटा पाहिल्याच पावसात वाहून गेला त्यामुळे सदर मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. मात्र जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी मार्गावर मोठमोठाले खड्डे पडल्याने प्रवाशांना सदर मार्ग धोकादायक ठरत आहे.
कुरखेडा येथील सती नदीवर असलेला पूल पाडून नव्याने बांधण्यात येत आहे. जुन्या पुलाच्या बाजूलाच पर्यायी मार्ग म्हणून रपटा तयार करण्यात आला होता. मात्र सदर मार्ग नदीच्या पाण्याने वाहून जाण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी सदर मार्गावरील वाहतूक २९ जून पासून बंद करून आंधळी- वाघेडा- मालदुगी मार्गे गोठांगाव नाका या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान ४ जुलै ला नदी वरील रपटा वाहून गेल्याने आंधळी – मालदुगी मार्गे वाहतूक सुरू करण्यात आली. सदर मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहत असून मालदुगी ते वाघेडा पर्यंत रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्या खड्ड्यात साचल्याने वाहतूकदारांना त्याचा अंदाज येत नाही. नदी वरील रस्ता बंद झाल्याने आता याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने रात्री बेरात्री प्रवास करताना मार्गावरील खड्ड्यात पाणी साचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही . तसेच काही वाहने त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पडल्याची बाब ही समोर आली आहे. जिल्हाधिकारी यांनी या मार्गाने प्रवास करण्यास सांगितले मात्र हा मार्ग खड्डेमय झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही नाही.त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून मागील वर्षी प्रशासनाकडे तक्रार केली होती परंतु सदर डांबरीकरण रस्ता आंधळी ते वाघेडा पर्यंत बनविण्यात आला. मात्र जिथून फुटला आहे त्या ठिकाणी अजून रस्ता बनविण्यात आलेला नाही. त्यामुळे इथे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवालही आता प्रवासी करीत असून तारेवरची कसरत करूनच तो मार्ग काढावा लागते आहे.

(#thegdv #gadvishava #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda )