The गडविश्व
गडचिरोली,दि. ११ : राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.
सन २०२४-२५ या कालावधीतील मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. तरी मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता लाभार्थ्यांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावे. आधार कार्ड/ मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेराक्स (आधार संलग्न), पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, इ. कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन एल.आय.सी. ऑफीस रोड, गडचिरोली या कार्यालयात सादर करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )