कुरखेडा : सती नदी पुलाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका, बस सेवा बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान

207

– मानव विकासची बस सेवा पर्यायी मार्गाने सुरू करण्यासाठी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ११ : येथील सती नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी बाजूलाच बांधण्यात आलेला रपटा पाहिल्याच पावसाने खचल्याने या मार्गावरील बस सेवा बंद झाल्याने याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी मानव विकास मिशन योजनेची बस सेवा पर्यायी मार्गाने पूर्ववत सूरू करून विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान टाळण्यात यावे अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारीमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग बांधकामाअंतर्गत कुरखेडा येथील सती नदीवरील पुलाला तोडण्यात आले. यावेळी या मार्गाची वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पुलाच्या बाजाच पर्यायी रपटा तयार करण्यात आला होता. मात्र तो पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान नदी पलीकडील ग्रामीण भागातील मोठ्या संख्येत विद्यार्थी तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांची आता मोठी अडचण होत असून शैक्षणिक नूकसान होत आहे. त्यामुळे आंधळी (नवरगांव) व खेडेगांव (अंतरगाव) या पर्यायी मार्गाची योग्य ती दुरुस्ती करून या मार्गाने मानव विकास मिशन ची बस फेरी तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना सेवानिवृत्त प्राचार्य पि.आर. आकरे, प्राचार्य अविनाश गौरकार, मुख्याध्यापक सुधिर ठवरे, मुख्याध्यापक रविंद्र अलगदेवे, मुख्याध्यापक नुतिलकंठावार हजर होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkehda #satiriver #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here