महागाव येथील येरोजवार कुटुंबाला जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

396

The गडविश्व
अहेरी, दि. १२ : तालुक्यातील महागाव येथील सुरेखा येरोजवार यांची काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने ते चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत आहे. येरोजवार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना बाहेरची औषध व इतर कमांसाठी आर्थिक अडचण भासत होती. सदर बाब काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांकडून कळताच त्यांनी चंद्रपूर गाठून नातेवाईकांना भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली तसेच रुग्ण सुरेखा येरोजवार यांना तब्येतीची आस्थेने विचारपूस करून येरोजवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली.
दरम्यान यावेळी कंकडालवार म्हणले कि यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य ते मदत करेन म्हणून येरोजवार कुटुंबियांना मोठा धीर दिला. या आर्थिक मदतीविषयी महागाव येथील येरोजवार कुटुंबातील सदस्यांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here