गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनला नवे नेतृत्व; उदय धकाते, तिलोत्तमा हाजरा संयोजकपदी

68

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनला नवे नेतृत्व; उदय धकाते, तिलोत्तमा हाजरा संयोजकपदी
– पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीला नवे बळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ :गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. जिल्ह्यातील मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल माध्यमांतील पत्रकारांचा समावेश असलेली ही कार्यकारिणी पत्रकारांचे हक्क, स्वातंत्र्य व सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवड प्रक्रियेत महाभारत न्यूज पोर्टलचे संपादक उदय धकाते यांची संयोजकपदी फेरनिवड करण्यात आली असून, ग्लोबल गडचिरोली न्यूजच्या मुख्य संपादिका तिलोत्तमा समर हाजरा यांची संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. नव्या नेतृत्वामुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा पत्रकार बांधवांतून व्यक्त होत आहे.
नव्या कार्यकारिणीत जिल्ह्यातील विविध वृत्तसंस्था, वृत्तपत्रे व न्यूज पोर्टल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सभासद म्हणून जयंत निमगडे (संपादक, गडचिरोली वार्ता), व्येकटेश दुडमवार (जिल्हा प्रतिनिधी, आज तक चॅनेल), अस्मिता दुडमवार (मुख्य संपादिका, गोंडवाना टाईम्स), प्रा. श्रीमंत सुरपाम (संपादक, एस भारत न्यूज), अनिल बोदलकर (संपादक, एव्हीबी न्यूज), निलेश सातपुते (लोकवृत्त), सुरज हजारे (के विदर्भ न्यूज), किशोर खेवले (लोक प्रवाह), कृष्णा वाघाडे (न्यू प्राणहिता न्यूज), मशाखेत्री (विदर्भ क्रांती न्यूज), हिताश्री जिवतोडे (द गडविश्व) आणि प्रविण चन्नावार (वृत्तवाणी) यांची निवड करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न, व्यावसायिक अडचणी, हक्क, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेसाठी संघटना अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पत्रकारांमध्ये समन्वय, एकजूट व व्यावसायिक मूल्यांची जपणूक करत लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याचा निर्धारही यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नव्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #AllMediaAssociation #JournalistsUnity #MediaLeadership #PressFreedom #JournalistsRights #FourthPillar #DigitalMedia #MediaUnity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here