ग्रामपंचायत रांगी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०४ : धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत येथे आद्य स्त्री शिक्षिका, समाजसुधारक माता सावित्रीबाई जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत रांगीच्या वतीने करण्यात आले होते.
सरपंचा सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक सुधारणेतील अमूल्य कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या मंचावर उपसरपंच नुरज हलामी, ग्रामपंचायत सदस्य राकेश कोराम, शशिकांत साळवे, दिनेश चापले, सौ. विद्या कपाट, सौ. शशिकला मडावी, सौ. अर्चना मेश्राम, सौ. वच्छलाताई हलामी, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भुरसे, संत गाडगे बाबा स्वच्छ ग्राम स्पर्धा अध्यक्ष शांताराम बरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आशा वर्कर सौ. सूर्यवंशी, सौ. चापले, सौ. पेंदम, उमेद प्रतिनिधी कपाट, अंतकाला दुग्गे, अंगणवाडी सेविका वरवाडे, कुकुडकर, भुरसे, पोलीस पाटील रामचंद्र काटंगे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी समाजातील शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला.














