जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इष्टाम कुटुंबाचे सांत्वन करत केली आर्थिक मदत

425

– कुटुंबाची आस्थेनेही केली विचारपूस
The गडविश्व
अहेरी, ९ एप्रिल : तालुक्यातील आलापली येथील रहिवासी बंटी इष्टाम यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आई वडिलांचे मातृत्वही हिरावले. अशा परिस्थितीत आत्याने पालनपोषण करून मोठे केले मात्र घरची परिस्थिती हलखीचे असल्याने हमालीचे कामे करत होता. दरम्यान तेलंगाणा राज्यातील शिरपूर येथे आलापल्लीच्या एका वाहनावर समान आणायला गेले असता वाहन पलटी होऊन बंटी इष्टामचे निधन झाले. ही बाब माहिती होताच आविंसचे विदर्भ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आलापल्ली येथे इष्टाम कुटूंबियांची भेट घेवून सांत्वन केले तसेच त्यांना आर्थिक मदत केली.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, सचिन रंगोनवार, सागर, मनोज सडमेक, ईस्टाम, विनोद रामटेके, आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.

(The gdv) (the gadvishva) (ajay kankadalwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here