धक्कादायक : दारूच्या नशेत जन्मदात्या बापाने चिमुकल्या मुलाचा गळा दाबून केला खून

2642

– स्वतावरही चाकूने वार करत केला आत्महत्येचा प्रयत्न
The गडविश्व
चंद्रपूर, ९ एप्रिल : दारू ही माणसाला कधी हैवाण बनवेल सांगता येत नाही. दारूमुळे एका चिमुकल्याचे प्राण गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याच्या राजोली येथे जन्मदात्या बापाने दारूच्या नशेत पोटच्या चिमुकल्या मुलाचा गळा दाबून खून केला व नंतर स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची मन सुन्न करणारी धक्कादायक घटना रविवार ९ एप्रिल रोजी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गणेश विठ्ठल चौधरी (३१) खून केलेल्या निर्दयी बापाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेश विठ्ठल चौधरी (३१) हा पत्नी काजल आणि ३ वर्षीय मुलगा प्रियांशुसह मूल तालुक्यातील राजोली येथे राहत होता. हनुमान जयंतीच्या दिवशी तो दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घाबरून घरून निघून गेली. घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहत होता दरम्यान गणेशने पुन्हा दारू ढोसून दारूच्या नशेत रविवार ९ एप्रिल रोजी पहाटे आपल्या पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केला. गळा दाबून खून केल्याने गणेशने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती होताच मूल पोलीस घटनास्थळ गाठून पंचनामा केला व गणेशला उपचारकरिता रुग्णालयात दाखल केले. तर घटनेची माहिती आई काजल ला माहीत होताच तिने हंबरडा फोडला.

(The gdv) (the gadvishva) (rajoli)(mul) (ganesh choudhari) (chandrpur)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here