The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षण सप्ताह 2024 अंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम आज २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता ज्यामध्ये प्रात्यक्षिक अनुभवाच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर आणि साहित्याचा वापर करून वेगवेगळे तंत्रज्ञानाबाबत व उपयोगाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित श्रीमती एच. जे. परसा मॅडम गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती गडचिरोली, श्रीमती संगीता खोब्रागडे विस्तार अधिकारी पंचायत समिती गडचिरोली, सहाळा विस्तार अधिकारी पंचायत समिती गडचिरोली, कोरेवार केंद्रप्रमुख बोदली, तसेच बी व्ही बेलखेडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित शाळेतील सर्व कर्मचारीवृंद विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सहकार्यासाठी लँड अ हॅन्ड इंडिया चे प्रतिनिधी मिलिंद भैसारे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन आर के खोब्रागडे मल्टी स्किल विषय समन्वयक तसेच ए बी कॉमनपल्लीवार ऑटोमोबाईल विषय समन्वयक यांच्या आयोजनातून कार्यक्रम घडून आले.
कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांच्या समक्ष विद्यार्थ्यांनी अनुभव सादर केले तसेच वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पन्नात कशी वाढ मिळवता येईल तसेच वेगवेगळ्या साधनाचा वापर करून पाण्याची बचत आर्थिक बचत वेळेची बचत कशी करता येईल याबाबत विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )