उन्हाळ्याचा आला असेल कंटाळा, तर चला आता ‘अरण्यम् ईको टूर्स’ सोबत पावसाळी निसर्ग पर्यटनाला

1327

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : उन्हाळ्यामुळे शरीराची लाही लाही झाली आहे. आता सर्वांना वेध लागले आहेत ते पावसाचे. पावसाळ्यात हिरवेगार जंगल, जिकडेतिकडे पक्ष्यांचा आवाज, हिरवाईने नटलेले दुर्ग, चहूबाजूस निसर्गच निसर्ग, आणि धबधब्यांचा खळाळणारा आवाज हे अनुभवायला कुणाला नाही आवडेल. शहरी जीवनातील धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ विश्रांती घेऊन तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात नेण्याचे काम आता अरण्यम् ईको टूर्स करणार आहे.
अरण्यम् ईको टूर्स चे पावसाळी महोत्सव निसर्ग पर्यटन येत्या १० जुलै पासून सुरू होत आहे. यात तुम्हाला धासगड धबधबा, महादेवगड ट्रेक व पक्षीनिरीक्षण आणि ऐतिहासिक माणिकगड किल्ला व अंमलनाला डॅम अश्या या पर्यटन स्थळांना भेट देता येईल. अवघ्या ९९९/- रुपये प्रति व्यक्ती पासून पॅकेज ची सुरुवात आहे.

ही मिळणार सुविधा

वाहतूक, न्याहारी आणि दुपारचे जेवण, गाईड, प्रथमोपचार, निसर्ग उपक्रम.

नियम अटी

आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोहोचणार नाही, पर्यटन स्थळी स्वच्छता राहील व तेथील सौंदर्य अबाधित राहील याची दक्षता पर्यटकांना घ्यावी लागेल. पर्यावरणावर कमी दुषपरिणाम, पर्यटकांसाठी व्यवहार्य पर्याय,शिक्षण आणि जनजागृती व निसर्ग संवर्धन ही निसर्ग पर्यटनाची वैशिष्ट्ये आहेत.

‘अरण्यम् ईको टूर्स’ चा जैवविविधतेचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा दृष्टिकोन आहे.

– स्वाधिनता बाळेकरमकर
संचालिका ‘अरण्यम् ईको टूर्स’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here