तुम्ही सेवन करत असलेली ‘ताडी’ पावडर मिश्रित ? , ‘या’ ठिकाणी विक्रेत्यावर धाड 

1434

– पावडर मिश्रित ताडी केली नष्ट
The गडविश्व
गडचिरोली, ९ एप्रिल : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात ताडी मिळते. ताडी पीने हे आरोग्यास चांगले आहे असे काहींचे म्हणणे आहे तर काहींचे धोक्याचे आहे असे म्हणणे आहे. मात्र पावडर या सर्वांचा विचार केला तर पावडर मिश्रित ताडी हे नक्कीच आरोग्यास धोक्याचे आहे. नुकताच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे पावडर मिश्रित ताडीची विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या धाड टाकून जवळपास १ ड्रम, ५ कॅन व २० बॉटल पावडर मिश्रित ताडी नष्ट केली.
कोंढाळा गावामध्ये पावडर मिश्रित ताडीची विक्री सुरु असल्याची माहिती गाव संघटनेनी दिली. प्राप्त माहितीच्या आधारे मुक्तिपथ तालुका चमू व देसाईगंज पोलिसांनी संयुक्तरित्या संबंधित विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून पाहणी केली असता, २० बॉटल, ५ कॅन पावडर आणि एक निळा ड्रम एवढी पावडर मिश्रित ताडी निदर्शनास आली. जवळपास अंदाजे ११ हजार ६०० रुपये एवढ्या किमतीची ताडी नष्ट करण्यात आली. सोबतच विक्रेत्याला विक्री न करण्याची तंबी देण्यात आली. देसाईगंज तालुक्यामध्ये आंध्र-तेलंगानातून आलेले काही लोक पावडर मिश्रित आणि सायट्रिक ऍसिड मिश्रित ताडीची विक्री करीत आहेत. नशा येण्यासाठी ताडीमध्ये विषारी पदार्थ मिश्रण केले जात  असून ही ताडी आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे लोकांनी ताडी पिऊ नये, असे आवाहन मुक्तिपथ अभियानाने केले आहे.

(The gadvishva) (the gdv) (gadchiroli tadi desaiganj)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here