The गडविश्व
गडचिरोली, ९ एप्रिल : गडचिरोली येथील पत्रकार मुकूंद जोशी यांची व्हॉईस ऑफ मीडिया’ साप्ताहिक विंगच्या प्रदेश कार्यवाहकपदी साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी नियुक्ती केली आहे.
मुकूंद जोशी यांची पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द आणि सक्रिय काम पाहून कार्यवाहकपदी नियुक्ती करत असल्याचे साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. मुकूंद जोशी यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ तर्फे विनोद बोरे साप्ताहिक विंग, प्रदेशाध्यक्ष यांच्या सहिनीशी प्राप्त झाले आहे.
खूप गतीने काम करून पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगिण विकासासाठी आपण काम करणार आहात, मुल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी, ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी यासाठीच आपण काम करणार आहोत. आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल, ही अपेक्षा आहे. आपण राज्याच्या विभागाच्या, जिल्ह्याच्या टीममध्ये सक्रीय राहून कार्य करावे. पुढील कामास गती द्यावी. आपले मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा असे पत्र पत्रकार मुकूंद जोशी यांना प्राप्त झाले आहे. मुकूंद जोशी यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्राप्त होताच आपल्या पत्रकारितेवर विश्वास ठेवत नियुक्ती केल्या बाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे संदीप काळे संस्थापक अध्यक्ष, अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष, विनोद बोरे साप्ताहिक विंग, प्रदेशाध्यक्ष यांचे आभार मानले आहे. त्यांच्या नियुक्तीने गडचिरोली येथील पत्रकारांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
आपल्या नियुक्ती बद्दल ‘The गडविश्व’ तर्फे हार्दिक अभिनंदन..
(the gdv) (the gadvishva) (gadchiroli news) (voice of media) (mukund joshi)