देसाईगंजच्या नव्या ‘खाकी’ नेतृत्वाचे भाजपकडून स्वागत; पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांचा सत्कार
The गडविश्व
देसाईगंज, दि. २८ : वडसा-देसाईगंज पोलीस ठाण्याची धुरा नवनियुक्त पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टी, देसाईगंज ग्रामीण तालुक्याच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी, तालुका महामंत्री तथा माजी सभापती मोहन पाटील गायकवाड, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे संचालक गोपाल उईके, माजी सरपंच तथा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष योगेश नाकतोडे आणि सामाजिक कार्यकर्ते चेतन मस्के उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार हे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देसाईगंज शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शहरातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, अशा शुभेच्छाही पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानले.













