The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : जिल्हाभरातील दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथच्या माध्यमातून बाराही तालुका मुख्यालयी तालुका क्लिनिकची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील आठवड्यात एकूण ४१ रुग्णांच्या समस्येचे निराकरण तालुका क्लिनिकतुन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण व शहरी भागातील दारूचे व्यसन असलेल्या रुग्णांना उपचाराची सुविधा गावात व शहरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुक्तीपंथ तर्फे गाव पातळी शिबिरासह तालुका स्थळावर नियोजित दिवशी क्लिनिकचे आयोजन करण्यात येते. यातून अनेकजण दारूचे व्यसनातून मुक्त झाले आहेत. तालुका क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व औषोधोपचार दिल्या जाते. मागील आठवण्यात विविध तालुका क्लिनिकतुन एकूण ४१ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये एटापल्ली तालुका क्लिनिक १९ पेशटने उपचार घेतला आहे. सिरोंचा ८ पेशंट, मुलचेरा ६ तर गडचिरोली क्लिनिकतून ८ रुग्णांनी लाभ घेतला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )