The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : सर्च रुग्णालयात ११ मे २०२४ रोज शनिवारला पोटविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले होते. पोटविकार ओपीडीकरीता नागपूर येथील पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे यांच्या सहकार्याने ७५ रुग्णांची पोटविकार आरोग्य तपासणी व ४० रुग्णांची एंडोस्कोपी तपासणी करण्यात आली.
पचनसंस्थेशी निगडीत विकाराचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी व उपचार करण्यात आले तसेच पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, शौचातून रक्त पडणे, कावीळ (पांढरी व पिवळी ) रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल, मळमळणे, आतड्या मधील सुज, पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, पोटात पाणी होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची पाचन चिन्हे आणि लक्षणे कशामुळे उद्भवत आहेत हे निर्धारित करण्यासाठी ४० रुग्णांची एंडोस्कोपी तपासणी करण्यात आली.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. पोटविकार ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत देण्यात आली. एंडोस्कोपी तपासणी ही १००% मोफत दरात देण्यात आली . विशेष म्हणजे १५ वर्षाखालील लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. सर्च रुग्णालयात होणार्या विशेषज्ञ ओपीडीचा रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)