98.55 टक्के निकालासह विद्याभारती कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची दमदार कामगिरी
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०४ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली संचालित स्थानिक विद्याभारती कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने यंदाही आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखत बारावी परीक्षेत 98.55 टक्के इतका उल्लेखनीय निकाल नोंदविला आहे.
महाविद्यालयातून एकूण 69 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सातत्यपूर्ण यशाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
यंदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये हर्षद संजय फुलबांधे याने प्रथम क्रमांक पटकावला असून सायली शीतकुरा गाडगोणे हिने द्वितीय, तर मंथशा सिराज पठाण हिने तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा लौकिक उंचावला आहे.
या यशामागे प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित वर्ग व चाचण्या, डिजिटल वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, तसेच मोफत वाय-फायसारख्या आधुनिक सुविधा कारणीभूत ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, विभाग प्रमुख प्रा. शैलेश हडप, तसेच प्रा. सुभाष घोंगडे, प्रा. तिरुपती बोरकर, प्रा. हरीश बावनथडे, प्रा. पी. के. बनसोड, प्रा. प्रियंका उईके यांना दिले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, कार्यकारणी मंडळ, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.













