कुरखेड्यात श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचा दबदबा ; तिन्ही शाखांत तालुक्यात अव्वल
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.०४ : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडून जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात श्रीराम कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखांत उत्कृष्ट यश संपादन करत तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत. महाविद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखत यंदाही तालुक्यात अव्वल ठरण्याचा मान मिळवला आहे.
कला शाखेत प्रथमेश कैलास मैद याने 600 पैकी 503 गुण (84.67%) मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. अश्लेषा पुंडलिक डोंगरवार हिने 77% गुणांसह द्वितीय, तर थामिनी राजेंद्र मेश्राम हिने तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेत मिलेनकुमार सुखदास राऊत याने 75% गुणांसह तालुक्यात उल्लेखनीय यश संपादन केले. विज्ञान शाखेत कोमल राजेंद्र प्रधान हिने 73% गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
यंदाही महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकवृंद तसेच पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.














