२० व २१ एप्रिल ला ‘सर्च’ रुग्णालयात मूत्रविकार शस्त्रक्रिया (युरोसर्जरी) शिबिर

90

The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात २० व २१ एप्रिल २०२४ दरम्यान मूत्रविकार शस्त्रक्रिया (युरोसर्जरी) शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये मुंबई येथील डॉ. मालव मोदी (युरोसर्जन) शस्त्रक्रिया करणार आहेत.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांना उच्च दर्जाची ऑपरेशन सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने मूत्रविकार शस्त्रक्रिया (युरोसर्जरी) शिबिर आयोजित करण्यात आले आहे. किडनी स्टोन (Kidney Stone) मूत्राशय पिशवी मध्ये स्टोन असणे (Bladder Stone) , लघवीची नळी चिपकलेली असणे ( Stricture Urethra), मूत्राशय नळीमध्ये स्टोन अटकलेला असणे ( Ureteric Stone), प्रोटेस्ट ग्रंथीची वाढ होणे (Prostate Gland) तसेच लघवीतून रक्त जाणे, लघवी अटकत/ थांबत येणे अशी लक्षणे असल्यास रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून घ्यावी. सर्च रुग्णालयामध्ये ऑपरेशन हे शिबिरांमध्ये होतात. शस्त्रक्रिया सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधी पूर्व तपासणी ही अत्यावश्यक आहे. ऑपरेशन शिबिराच्या आधी नाव नोंदणी करण्यासाठी १३ एप्रिल २०२४ पर्यंत दवाखान्यात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करुन घ्यावी. सर्च रुग्णालय गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांना मोफत ऑपरेशन सुविधा देत आहे. प्रथम नाव नोंदणी करणा-या रुग्णास प्राधान्य देण्यात येईल. मूत्रविकार शस्त्रक्रिया(युरोसर्जरी) शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे. रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here