मोहझरी येथील दारू विक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट

86

– गडचिरोली पोलीस व मुक्तिपथची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : होळीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहझरी जंगलपरिसरात गडचिरोली पोलिस व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करीत जवळपास ७० हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य नष्ट केले.
होळीच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मोहझरी येथील दारू विक्रेते हातभट्टी लावून दारू गाळीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी ठिकठिकाणी दारूविक्रेत्यानी लावलेले अड्डे उध्वस्त करण्यात आले. सोबतच ७० हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा, साहित्य नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील धनंजय चौधरी, लंजे, इतर पोलिस कर्मचारी व मुक्तिपथचे तालुका संघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
दुसऱ्या दिवशी मुक्तीपथ अंतर्गत गावातील दारू समूळ नष्ट करण्या हेतू, गावाची मोठी सभा आयोजित करण्यात आली.यावेळी गाव संघटना स्थापन करून अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अवैध दारू विक्री आढळल्यास सदर व्यक्तीवर दंड बसवला जाईल असे ठरले. या निर्णयामुळे गावातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here