रांगी येथे ‘पदमा’ पिकाची प्रात्यक्षिकासह पाहणी; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०५ : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अंकुर सीड्स कंपनीच्या ‘पदमा’ पिकाची पाहणी व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम रांगी येथे आयोजित करण्यात आला. ३ नोव्हेंबर रोजी प्रगतशील शेतकरी शमिरखान पठाण यांच्या शेतावर हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शेतकऱ्यांना ‘पदमा’ पिकाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पिकाची लागवड, वाढ, उत्पादन क्षमता, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष पीक पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
अंकुर सीड्स प्रा. लि., नागपूरचे टेरिटरी मॅनेजर मनीष पटले, गडचिरोली समन्वयक प्रफुल करमकार, शुभम मंडल व मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला रांगी, बोरी, मोहाली व बेलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्यक्ष शेतावर पीक पाहणी आणि तज्ज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक पीक व्यवस्थापनाची माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे आयोजन एस. खान कृषी केंद्र, रांगीचे संचालक सोहेल खान यांनी केले.













