धनत्रयोदशीला रोकडे ज्वेलर्सची गडचिरोलीकरांना खास भेट; ‘G.O.A.T.’ मेगा ऑफर जाहीर

2

धनत्रयोदशीला रोकडे ज्वेलर्सची गडचिरोलीकरांना खास भेट; ‘G.O.A.T.’ मेगा ऑफर जाहीर
-सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर ४० ते ६० टक्के सूट; गडचिरोलीतील शोरूम आठवड्यातील सातही दिवस सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रोकडे ज्वेलर्सने गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भातील ग्राहकांसाठी ‘G.O.A.T.’ मेगा ऑफर जाहीर केली आहे. गडचिरोलीत नुकतेच नवीन शोरूम सुरू केलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या या ऑफरमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर विविध सवलती देण्यात येणार आहेत. ही ऑफर ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

या योजनेअंतर्गत २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर ४० टक्के, तर १८ कॅरेट दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर ६० टक्के सूट देण्यात येणार आहे. डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर १०० टक्के सूट आणि जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर मूल्यांकनाच्या १०१ टक्के मूल्याचा लाभ देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. हे लाभ नियम व अटींच्या अधीन राहतील.

सन १९०२ पासून सराफा व्यवसायात कार्यरत असलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या नागपूर शहरात महाल, लक्ष्मीनगर, इतवारी, हिंगणा रोड, कोराडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शाखा आहेत. याशिवाय भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथेही शोरूम कार्यरत आहेत. गडचिरोलीतील नवीन शोरूममुळे जिल्ह्यातील ग्राहकांना आता स्थानिक पातळीवर कंपनीच्या दागिन्यांची खरेदी करता येणार आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, सर्व शाखांमध्ये बीआयएस हॉलमार्कयुक्त सोन्याचे दागिने उपलब्ध आहेत. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क अथवा सरचार्ज आकारले जाणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

धनत्रयोदशी आणि दिवाळीनिमित्त विदर्भातील ग्राहकांसाठी ही विशेष ऑफर आणल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले. गडचिरोली येथील शोरूम आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार असून, बुधवारीही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या ऑफरचा लाभ ११ नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. नियम व अटी लागू राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here