‘मोऱ्या’ चित्रपट ठरला सुपरहिट ; प्रेक्षकांसाठी आकर्षण

245

The गडविश्व
मुंबई, दि. २८ : अनेक अडचणींवर मात करीत अत्यंत चतुराईने ‘मोऱ्या’ हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांची विशेष लक्ष पुरवून चित्रपटाच्या कल्पक वितरणासोबत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालत प्रसिद्धी व मार्केटिंग व्यवस्थापन करून मुंबई, व उपनगर, पुणे आणि धुळे या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून आपला जम बसवत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे येण्यासाठी आकर्षित केले आहे.
ऐन राजकीय शिमग्याच्या आयपीएल मोसमात ‘मोऱ्या’ खरोखर प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरला आहे. विशेष आकर्षण निर्माण करणारे पोस्टर आणि अत्यंत नजाकतीने कापलेला चित्रपटाचा सुबक ट्रेलर, चित्रपटाचे वेगळे कथागुणधर्म, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, संगीत आणि सोशल मीडियावरील चर्चा, पोस्ट पाहून प्रेक्षकांची पाऊले आपसूकच चित्रपटगृहाच्या दिशेने वळत असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मोऱ्याची शीर्षक भूमिका करणारे अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी दिली आहे.
मराठी चित्रपटांच्या ट्रेंड पेक्षा वेगळा विषय असलेल्या ‘मोऱ्या’ला मिळत असलेला “द्विगुणित करणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवीत असून सर्व टीमने तीन वर्षे घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. येत्या आठवड्यात ‘मोऱ्या’ महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणी आम्ही प्रदर्शित करू, मराठी रसिकांचे प्रेम आम्हाला असेच मिळणार आहे” असे ‘मोऱ्या’च्या सर्व निर्मात्यांनी म्हटले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gachirolipolice #naxal #gadchirolipolice #)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here