गडचिरोली : दारुसह २० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

84

– धडक कारवाईने अवैधरीत्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. गडचिरोली पोलिस अवैधरीत्या दारु विक्री व वाहतुक करणाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठार असून १५ मे रोजी अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली येथे धाड टाकून देशी विदेशी दारू, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने असा एकूण २० लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईने अवैधरीत्या व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­ऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये १५ मे रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आल्लापल्ली येथे योगेश अरुणसिंग चव्हाण हा देशी विदेशी दारुची अवैध दारु विक्री करीत आहे. अशी गोपनिय बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. वाघमोडे, पोउपनि काळे, व पोलीस स्टाफसह पोस्टे अहेरी येथून सदर ठिकाणी रवाना झाले. पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच आरोपी योगेश चव्हान याच्या घराच्या अंगणात असलेल्या एम.एच.–३४ -ए.एम.– ८५४९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनामध्ये ४ लाख ५७ हजार २०० रुपयांचा दारुच्या पेट्यांनी भरलेला मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आला. यासोबतच आलापल्ली येथील दोन इसम चारचाकी वाहनातुन दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनिय बातमीदारांकडुन खात्रिशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाद्वारे आलापल्ली परिसरात वाहणाची पाहणी करित असतांना गुड्डु वर्मा, रा. चंद्रपुर अरविंद हिरामण भांडेकर, रा. येवली तह. व जि. गडचिरोली नामक व्यक्ती एम.एच-३२-सी.-६०५० क्रमांकाच्या वाहनातून देशी विदेशी वाहतूक करीत होते याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन वाहनासह १५ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . तसेच अधिक चौकशी केली असता सदर मुद्देमाल किशोर डांगरे रा. आलापल्ली याचा असून सुलतान शेख रा. चंद्रपुर हा त्याचा पार्टनर असल्याचे निष्पन्न झाले.
सदर दोन्ही कारवाईत एकूण २० लाख ५५ हजार २०० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरच्या दोन्ही कार्यवाह्या पोलीस अधीक्षकनीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि. वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोहवा/लोहबंरे, पोहवा/बांबोळे, चापोहवा/मोहुर्ले, पोअं/वडजु दहिफळे, पोअं/उध्दव पवार व पोअं/सुरज करपेत यांनी पार पाडल्या.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here