– ४० हजार रूपायांची स्विकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली, ८ डिसेंबर : राज्य कृषी यांत्रीकीकरण योजनेअंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याच्या सबसिडीची रक्कम जमा करून दिल्याचा मोबदला म्हणून ५० हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रूपयांची लाच स्विकारतांना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली लेखा विभागातील वरिष्ठ लिपीक संदिप अशोकराव वैद्य (३३) आणि तालुका कृषी अधिकारी प्रदीप पुंडलिक वाहाने (४९) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाईने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदारास राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम ११ लाख रूपये बॅंक खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून वरिष्ठ लिपीक संदीप वैद्य यांनी ५० हजार रूपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती स्वत: व तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहाने यांच्यासाठी ४० हजार रूपये लाच रकमेची पंचसाक्षिदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली. वरिष्ठ लिपीक संदीप वैद्य यांनी तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रूपये लाच रक्कम गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय समोरील चंद्रपूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गालगत असलेल्या चहा टपरीवर स्विकारतांना रंगेहाथ मिळून आले तसेच या स्विकारलेल्या लाच रकमेस तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहाने यांनी सहमती दर्शवून लाच रक्कम ४० हजार रूपये पैकी २० हजार रूपचे पंचासमक्ष उपविभागीय कृषी कार्यालय गडचिरोली येथे स्विकारल्याने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे भ्रष्टाचार प्रतिबंक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या पर्यवेक्षनात पोनि शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, नापेशि राजु पदमगिरीवार, स्वप्निल बांबोळे, किशोर जौजारकर, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, संदिप उडाण, मपोशि जोत्सना वसाके यांनी केली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (ACB Trap)