दारू विक्री न करण्याच्या विक्रेत्यांना सूचना

181

-चांभार्डा येथे गाव संघटनेची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, ८ डिसेंबर : तालुक्यातील चांभार्डा येथे आयोजित बैठकीत दारूविक्रेत्यांना बोलावून दारू विक्री न करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. तसेच अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यास दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा गाव संघटनेने दिला आहे.
चांभार्डा येथील मागील अनेक वर्षापासून दारू विक्री बंद होती. एक दारू विक्रेता मागील ७ ते ८ दिवसांपासून दारू विक्री करीत असल्याचे गाव संघटनेच्या लक्षात आले. दारू विक्रेत्यांची संख्या वाढू नये, गावातील सुव्यवस्था,शांतता भंग होऊ नये, व्यसनाच्या प्रमाणात वाढ होऊ नये, यासाठी सावध पवित्रा घेऊन मुक्तीपथ गाव संघटनेने बैठकीचे आयोजन केले. सदर बैठकीत गावातील दारूविक्रेत्यांनाही बोलावून दारू विक्री करू नये, अशा सूचना गाव संघटनेकडून देण्यात आल्या. समोर चालून दारू विक्री सुरूच ठेवल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला. यावेळी पोलिस पाटील अश्विनी मेश्राम, गाव संघटनेचे अध्यक्ष मुखरू चनेकार, विनोद मुत्तेमवार, गोपाळ लाजुरकर, दीलकांत चरडूके, विलास पेद्दुमवार, गणेश कावळे, प्रकाश लजुरकर, मुक्तिपथचे तालुका उपसंघटक रेवणाथ मेश्राम, स्विटी आखरे यांच्यासह गाव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here