दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या विजयाचा गडचिरोलीत जल्लोष

187

The गडविश्व
गडचिरोली, ८ डिसेंबर : दिल्ली, पंजाब राज्यानंतर दिल्ली नगर निगम मध्ये आम आदमी पार्टीला अरविंद केजरीवाल यांच्या स्वछ, आणि पारदर्शक राजकारने
मोठे यश प्राप्त झाले. दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षावर विश्वास दाखवून केजरीवाल यांच्या नेतृत्वात गुजरात राज्यात पहिल्यादा पाच आमदार निवडून आनत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याने देशभरात आम जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस, भाजप नंतर आम आदमी पार्टी देशात फोपावत आहे. याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरात मिठाई वाटून आनंद साजरा केला.
यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष संजीव जिवतोडे, जिल्हा संघटन मंत्री देवेंद्र मुनघाटे, जिल्हा महिला संयोजक मिनाक्षी खरवडे, शहर सह संयोजक रुपेश सावसाकडे, शहर महिला संयोजक समीता गेडाम, शहर संघटक हितेंद्र गेडाम, शहर सह संयोजक गणेश त्रिमुखे, कोटकर, पेटकर, एकनाथ गजबे इत्यादी कार्यकर्ता हजर होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Aam Admi Party) (Arvind Kejriwal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here