– वाघांच्या मृत्यसत्राने वनविभागात खळबळ
The गडविश्व
चंद्रपूर / नागभीड , ८ डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे मृत्यूसत्र सुरूच असतांना पुन्हा एक वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. नागभीड तालुक्यातील चिंधीचक हुमा बिट मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेने वनविभागात खळबळ उडाली असून यापूर्वीही आठवडाभरात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यामुळे या वाघांच्या मृत्यू सत्राने मात्र चंद्रपूर वनविभाग प्रशासन खळबळू उठले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील चिंधीचक हुमा बिटात सकाळच्या सुमारास वनकर्मचारी गस्तीवर असतांना एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत असून वाघाचा काही भाग रानकुत्र्यानी खाल्लेला होता असे कळते. मृतक वाघाचा घटनास्थळीच शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.
(The Gadvishva) (Chandrapur News Updates) (Chandrpur Tiger) (A tiger was found dead in Chindichak area)