देसाईगंज : मुलगाच निघाला बापाचा खुनी, पोलीसांनी आवळल्या मुसक्या

834

– पाच दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
ता. प्र. / देसाईगंज, ८ डिसेंबर : येथील एका इसमाची हत्या करून शहरापासून १ किमी अंतरावरील गोंदिया मार्गावरील रेल्वे पटरीच्या नजीक मृतदेह टाकुन दिल्याची घटना सोमवार ५ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. अरूण संपत कोवे (५३) रा. शिवाजीवार्ड असे मृतकाचे नाव होते. सदर प्रकरणाबाबत देसाईगंज पोलीसांनी अधिक तपास केला असता सदर हत्या त्यांच्या मुलानेच केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी करण अरूण कोवे (२८) याला पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोमवारी देसाईगंज पासून १ किमी अंतरावर रेल्वे पटरीच्या नजीक अरूण कोवे यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी देसाईगंज पोलीसांनी अज्ञाताविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता. दरम्यान पोलीसांनी तपासाचे चक्र अधिक गतीने फिरविले असता तपासाअंती मृतक अरूण कोवे यांचा मुलगा करण यानेच पित्याची हत्या केल्याचे उघडकीस आले.
करण आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाल्याने पत्नी माहेरी गेली होती. आपल्या पित्यामुळेच आपली पत्नी माहेरी गेली असल्याचा राग होता. राग अनावर झाल्याने सोमवारी दुपारच्या सुमाारास रेल्वे पटरीजवळ त्याने पित्यावर हातोडयाने वार करीत त्यांची हत्या केल्याचे देसाईगंज पोलीसांसमोर कबुल केले. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी पुत्रास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश मेश्राम करीत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Desaiganj) (Murder) (The son turned out to be the murderer of the father)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here