The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ८ ऑक्टोबर : तालुक्यातील खरकाडा येथील माजी सरपंच आत्माराम नागोजी नाकाडे यांचे आज ८ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षाचे होते.
ते माजी पं.स.सदस्य महादेव नाकाडे व पत्रकार विजय नाकाडे यांचे वडील आहेत. त्यांच्या पार्थीवावर आज येथील सतीनदी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा पच्छात पत्नी, दोन मुले, तिन मुली व मोठा आप्तपरीवार आहे.