बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती द्या ; एक लाखांचे बक्षीस मिळवा

98

बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती द्या ; एक लाखांचे बक्षीस मिळवा
– बेकायदेशीर गर्भलिंग निदानावर प्रशासनाचा कडक इशारा, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा बेकायदेशीर प्रकारांची खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीस शासनामार्फत एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लाहाडे यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे ६ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. लाहाडे होत्या. यावेळी जिल्ह्यातील ४० नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल

जिल्ह्यात कुठेही गर्भलिंग परीक्षणातून अवैध गर्भपात, अपात्र व्यक्तीकडून सोनोग्राफी तपासणी किंवा अन्य गैरप्रकार होत असल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणारी व्यक्ती नागरिक, कर्मचारी किंवा अधिकारी कोणीही असू शकते. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे.

तक्रार नोंदविण्याचे पर्याय

बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची तक्रार टोल-फ्री क्रमांक: 1800002334475 / 104 तसेच वेबसाईट : amchimulgimaha.in व थेट संपर्क जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करता येणारा आहे.

या बैठकीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, डॉ. निलकंठ मसराम, डॉ. प्रशांत पेंदाम, डॉ. प्रशांत आखाडे, तसेच विधी सल्लागार ॲड. संजय ठाकरे, गणेश नेते, लताताई पुनघाटे, पुष्पाताई लाडवे आदी सदस्य उपस्थित होते. सभेची प्रस्तावना व आभार प्रदर्शन पीसीपीएनडीटी विधी सल्लागार ॲड. तृप्ती राऊत यांनी केले.

#thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here