अभिमानास्पद : गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर

1240

– नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केल्याचे फलित
The गडविश्व
गडचिरोली, २५ जानेवारी : पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार

१) श्री. मनिष कलवानिया, भा.पो.से. पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, ( 1st BAR TO PMG)
२) पो. नि. संदिप पुंजा मंडलिक, (2nd BAR TO PMG)
३) पो.नि. अमोल नानासाहेब फडतरे
४) स.पो.नि. राहुल बाळासो नामदे
५) स.पो.नि. सुनील विश्वास बागल
६) स.पो.नि. योगीराज रामदास जाधव
७) पोउपनि सदाशिव नामदेव देशमुख
८) पोउपनि प्रेमकुमार लहु दांडेकर
९) पोउपनि राहुल विठ्ठल आव्हाड
१०) सफौ./३२४८ देवाजी कोत्तुजी कोवासे
११) पोहवा / ८७३ देवेंन्द्र पुरुषोत्तम आत्राम
१२) पोहवा / ८७३ देवेंन्द्र पुरुषोत्तम आत्राम ( 1st BAR TO PMG)
१३) पोहवा / २७९५ राजेंन्द्र अंताराम मडावी
१४) पोहवा / २७६४ नांगसु पंजामी उसेंडी ( 1* BAR TO PMG)
१५) नापोअं / २८६७ सुभाष भजनराव पदा
१६) पोअं / ५१५० रामा मैनु कोवाची
१७) पोअं/ ५९४४ प्रदिप विनायक भसारकर
१८) पोअं / ५६९६ दिनेश पांडुरंग गावडे
१९) पोअं/ ३८१३ एकनाथ बारीकराव सिडाम
२०) पोअं / ४१६२ प्रकाश श्रीरंग नरोटे
२१) पोअं/ ५७६१ शंकर दसरु पुंगाटी
२२) पोअं/७९० गणेश शंकर डोहे
२३) पोअं / ३३०५ सुधाकर मानु कोवाची
२४) पोअं/ ४२०२ नंदेश्वर सोमा मडावी
२५) पोअं/ ५६३६ भाऊजी रघु मडावी
२६) पोअं / ५७५७ शिवाजी मोडु उसेंडी
२७) पोअं / ५३९९ गंगाधर केरबा कराड
२८) पोअं/ ५९१२ महेश पोचम मादेशी
२९) पोअं/ ४५७६ स्वप्नील केसरी पदा
यांना पदक मिळाले आहे.

मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमदारांनी उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केल्याबाबत गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (UPSSSC PET Result) (Southampton vs Newcastle) (Adani) (Bundesliga) (STA vs THU) (‘Police Gallantry Medal’) (Gadchiroli Police)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here