झाडीपट्टी कलावंत डॉ. परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

743

– झाडीपट्टीतील कलावंताकरीता अभिमानास्पद
The गडविश्व
गडचिरोली, २५ जानेवारी : पद्म पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. झाडीपट्टीतील कलावंत डॉ. परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने झाडीपट्टी रंगभूमी क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून ही झाडीपट्टी रंगभूमीतील कलावंतांकरिता अभिमानास्पद आहे. झाडीपट्टी रंगभूमी क्षेत्रातून तसेच सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. झाडीपट्टी युट्युबर होमदेव कोसमशिले यांनी डॉ. खुणे यांची DK ZADIPATTI EXPRESS या युट्युब चॅनलच्या माध्यमातून “संवाद झाडीपट्टीचा” या विषयावर मुलाखत घेतली आहे.

युट्युब विडिओ लिंक : https://youtu.be/zKQRRS1CyvA

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली गावातील डॉ.परशुराम खुणे झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. त्यांनी आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर इजारो नाटकातून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांना १९९१ ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, १९९२ ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, १९९५ ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. खुणे यांच्या सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, लग्नाची बेडी, एकच प्याला, मरीमायचा भुत्या, लावणी भुलली अभंगाला, मी बायको तुझ्या नवऱ्याची, एक नार तीन बेजार, बायको का मातून गेली? नाथ हा माझा, इत्यादी नाटकातील भूमिका अत्यंत गाजल्या. विशेषत: ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके/ निळू फुले’ अशीही त्यांची ख्याती असून डॉ. खुणे १५ वर्षे गुरनुलीचे सरपंच व ५ वर्षे उपसरपंच होते. १० वर्ष झाडीपट्टी कला मंचचे ते अध्यक्ष होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही ते करीत आहेत.
पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी साधारणतः मार्च/एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या समारंभात प्रदान केले जातात. वर्ष २०२३ साठी, राष्ट्रपतींनी ३ जोडी प्रकरणांसह १०६ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे (दोन प्रकरणात, पुरस्कार एक म्हणून गणला जातो). या यादीत ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी १९ महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील २ व्यक्ती आणि ७ मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) ( Zadipatti Acctor Dr. Parshuram Khune) (Padma Padmshari Padmbhushan)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here