दादालोरा खिडकी अतंर्गत धानोरा पोलीस ठाण्यात महीला मेळावा संपन्न

184

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १० मार्च : पोलीस अधिक्षक नीलोत्पल सा., अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे सा., अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंता सा., यांच्या संकल्पनेतुन तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव सा.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस स्टेशन धानोरा तर्फे ८ मार्च रोजी सकाळी १०.०० वा. डी.एड. कॉलेज धानोरा च्या पटांगणावर भव्य महिला मेळावा पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक नगरपंचायत धानोराच्या नगर सेविका सौ. देवागंणी चौधरी यांचे हस्ते सावित्रीबाई फुले व जिजाऊ माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर महिला मेळाव्याला अध्यक्ष म्हणून पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस निरीक्षक सुधाकर देडे सा. तसेच प्रमुख अतिथी सो. कल्याणी गुरनुले नगर सेविका नगर पंचायत धानोरा, सौ. सुषमा भुरसे नगर सेविका नगरपंचायत धानोरा, सौ यामिनी पेंदाम नगरसेविका नगर पंचायत धानोरा, सौ. बर्वे मॅडम तालुका अध्यक्षा धानोरा, सौ.गितांजली देडे मॅडम आणि महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली भिसे में, एसआरपीएफचे पोउपनि तपासे सा. व पोलीस स्टेशन धानोरा येथील सर्व महिला पोलीस अंमलदार मंचावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपस्थित महिलाना महिलाविषयक सविस्तर माहिती देवून योग्य मार्गदर्शन केले तसेच महीलाचे अधिकार, त्याचे हक्क, आणि त्यांचा घरात व समाजात असणारा दर्जा यासर्वांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस निरीक्षक सुधाकर देडे सा. यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन करुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच सेट अप बॉक्स वाटप करीता सर्व महिलांकडुन त्यांचे कागदपत्र घेण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी पोस्टेचे सर्व जिल्हा पोलीस कर्मचारी तसेच होगगार्ड तसेच पोलीस स्टेशन धानोरा हद्दीतील १५० ते १८० महिला उपस्थित होते. सर्व महिलांना महिला दिनानिमित्त भेट वस्तु म्हणुन साडयांचे वाटप करण्यातआले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Women’s Day quotes) (Holi Wishes in Hindi) (Tu Jhoothi Main Makkar) (Dhanora) ( police dada lora khidki)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here