मुरुमगाव येथे जागतिक महिला दिन साजरा

146

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १० मार्च : तालुक्यातील मुरुमगाव येथे जागतिक महिला दिन पोलीस मदत केंद्र मुरुमगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शैला कवाडकर हे होते तर उद्घाटन गणवीर असिंडन कमांडण ११३ बटालियन यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून रावत सीआरपीएफ पोलीस निरिक्षक, मिथुन शिरसाट प्रभारी अधिकारी, सचिन ढेंग पी. एस. आय.अर्चना देशमुख, शैला कवाडकर, आसकुवर मलिया, गंगू ईबात्तीवर, पार्वती गवर्णा, शिवप्रसाद गवर्णा सरपंच, विनोद आखाडे, आशा कुसराम हे होते.
यावेळी मान्यवरांनी विधिवत सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोंचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात अर्चना देशमुख यांनी जागतिक महिला दिनाची माहिती सांगून महिलांनी कोणत्याही अडचणीला ना डगमगता समोर जाऊन आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करावे तसेच समाज, राजकीय कार्यात सहभागी होऊन समोर जातात अशी माहिती सांगितली. तसेच मान्यवरांनी महिला दिनाचे महत्त्व समजून देले.यात शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर करून यात आभार पोलीस अंमलदार सुजाता पडोटे यांनी मानले तर आभार कु. बंटी दुग्गा हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव करमकर, कृष्णा उसेंडी, आशा कुसराम, सरिता पद्दा, ज्योतीका मडावी इतर अंमलदार कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Women’s Day quotes) (Holi Wishes in Hindi) (Tu Jhoothi Main Makkar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here