कुरखेडा : लेंढारी नाल्यावरून चारचाकी खाली कोसळून अपघात, दोघेजण जखमी

1102

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १० मार्च : तालुक्यातील कुरखेडा- पुराडा मार्गावर असलेल्या लेंढारी गावानजीकच्या लेंढारी नाल्याच्या पुलावरून चारचाकी वाहन खाली कोसळून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सरफराज खालिद शेख (२४) रा. शिरपुर, प्रणय पुरुषोत्तम उईके (२२) रा. गांगोली असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दोन्ही युवक गुरुवारी रात्रोच्या सुमारास देवरी येथून कार्यक्रम आटोपून चारचाकीने शिरपूरकडे परत येत होते. दरम्यान लेंढारी नाल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी पुलावरून खाली कोसळली. अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याने अपघातग्रस्तांना कुठलीही मदत मिळाली नाही व वाहनाचे चारही दरवाजे लॉक झाल्याने जखमी अवस्थेत रात्रभर वाहनातच रहावे लागले. घटनेची माहिती शुक्रवारी सकाळच्या सुमारास एकास माहित होताच जखमींना वाहनातून बाहेर काढले व इतरांना माहिती देत जखमींना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरीता ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Women’s Day quotes) (Accident) (Kurkheda) (Lendhari Nala) (Jambhukheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here