पोलीस–नक्षल चकमकीप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश

23

पोलीस–नक्षल चकमकीप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश
– एटापल्ली उपविभागात प्रत्यक्षदर्शींना निवेदन सादर करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत पोलीस स्टेशन गट्टा हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात १७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पोलीस–नक्षल चकमकीदरम्यान दोन महिला नक्षलवादी शस्त्रांसह मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. या घटनेतील मृत्यूच्या कारणांचा सखोल शोध घेण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, सदर घटनेची प्रत्यक्ष माहिती असलेल्या किंवा चौकशी प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली लेखी माहिती शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्या न्यायालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही निवेदने जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
निवेदनामध्ये घटनेचा प्रत्यक्ष अनुभव, आपण पाहिलेल्या घटना, घटनेपूर्वी अथवा नंतर घडलेल्या संबंधित बाबी, तसेच या प्रकरणाशी निगडित शासकीय किंवा अन्य यंत्रणांची भूमिका व प्रतिक्रिया याबाबतची माहिती नमूद करावी, असे उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांनी स्पष्ट केले आहे.
या चौकशीच्या माध्यमातून घटनेबाबतची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून सत्य परिस्थिती उघड करण्याचा उद्देश असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
albacete vs real madrid, भारत बनाम न्यूजीलैंड, warriorz vs capitals, chelsea vs arsenal, pongal kolam 2026

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here