लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे जागतिक महिला दिवस साजरा

153

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे जागतिक महिला दिवस साजरा
– महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक विविध खेळांचे आयोजन
The गडविश्व
एटापल्ली, १६ मार्च : लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
पुरातन काळापासुनच स्त्रीला अनन्य साधारण महत्व असुन स्त्री ही अनंत काळाची माता आहे असे संबोधीले जाते. या उक्तीस अनुसरुन ८ मार्च हा दिवस जागतीक महिला दिन म्हणुन राज्यात सर्वत्र साजरा केला जातो. सदर महिला दिनाचा औचित्य साधुन शालेय मुली, महाविद्यालयीन युवती व सर्व महिलांध्ये तंदुरुस्ती व आरोग्य या बाबत जागृकता निर्माण करण्याकरीता मुलींना अधिकाअधिक क्रीडा विषयक सोई सुविधा, मोकळे वातावरण, कौशल्याची संधी, मुलींच्या आरोग्य न्युट्रेशन, योग्य सवयी उपलब्ध करुन दिल्यास स्त्रीयांची पर्यायाने कुटुंबाची सुधारणा होऊन सशक्त समाज उभा राहील.
या कार्यक्रमाचे उदघाट्न सफाई कर्मचारी सौ. सुशीला तोरे, सुनीता आत्राम यांचे शुभ हस्ते करण्यात आला. सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे महिलांना प्रशिक्षनार्थी महिलांना, युवतीना, स्वागत करून पुष्पा गुच्छ देऊन सत्कार कारण्यात आला. त्या नंतर भाषण, संस्कृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चमचा गोळी, मटका पोडी, संगीत खुर्ची इत्यादी मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजन करण्यात आला. स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले.
जागतिक महिला दिना विषयी प्रज्ञा वाघमारे मॅडम, यांनी अति मोलाची मार्गदर्शन केलेत या वेळी उपस्थित स्नेहा सोनवणे मॅडम, शेवंता गोटा मॅडम, कल्पना बोमंवार मॅडम, शिवानी करमारकर मॅडम, आर्चना बनकर, माधवी नालीवर मॅडम, गणेश शेट्टी सर, डॉ. गोपाळ रॉय, सर्व मंचवार उपस्थित मान्यवारा णी मोलाचे मार्गदर्शन केले.
वस्त्र उद्योग व प्रशिक्षण महिला, युवतीनी या कार्यक्रमाचे स्वतःहून आयोजन करून अति उत्तम कामगिरी करून यशस्वीरीत्या पार पडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here