चिमूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता कर्मचारी बेमुदत संपावर

262

– चिमुरातही पडसाद
The गडविश्व
चिमूर, १६ मार्च : राज्यातील २००५ नंतरच्या सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभर शिक्षक संघटना आणि शासकीय कर्मचारी संघटना आंदोलन करत आहे. याचे पडसाद चिमूर येथेही दिसुन येत असून १४ मार्च पासून चिमूर येथील तहसील कार्यलयासमोर राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक व सर्व कर्मचारी संघटना संपावर बसलेले आहे.
तसेच संघटनांच्या वतीने चिमुरच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतांना शिक्षक केदार, वैभव चौधरी, माधव पीसे, सरोज चौधरी, अतुल महाजन, बारेकर, मुनघाटे आदी उपस्थित होते. संपादरम्यान एकच मिशन जुनी पेंन्शन अशा घोषणा देत सरकार कीतीही कारवाई करु द्या आता आम्ही कारवाईला घाबरणारे नाही, सडून मरण्यापेक्षा लढुन मरु असे म्हणत सर्व कर्मचारी आपल्या भुमीकेवर ठाम असून चिमुर तालुक्यातील या संपाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतानाचे दिसून येत आहे. याबाबत सरकार काय भुमीका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here