धानोरा तालुक्यातील कर्मचारी जुनी पेन्शन संपात सहभागी

210

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १६ मार्च : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका शाखा धानोरा च्यावतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार धानोरा तहसील कार्यालय यांच्यामार्फत संपात सहभागी होत असल्याचे निवेदन देण्यात आले.
१९८२ व १९८४ जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासंदर्भात धानोरा तालुक्यातील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपावर कर्मचारी आहेत. त्यात पंचायत समिती अंतर्गत धानोरा तालुक्यामधील ‘क’ गटातिल ४११ गट, ब गटातिल ०२, ड मधिल ३० असे एकूण ४४३ कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाली आहेत. अशी माहिती पंचायत समिती धानोरा यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here