कुरखेडा : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला सुरूवात

52

– जास्तीत जास्त पदवीधरांनी सहभागी होण्याचे तहसीलदार राहुल पाटील यांचे आवाहन
The गडविश्व
कुरखेडा, दि.०१ : नागपूर पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियानास कुरखेडा तालुक्यात सुरूवात झाली आहे. तालुक्यातील सर्व पात्र पदवीधरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन तहसीलदार राहुल पाटील यांनी केले आहे.
तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुक पदवीधरांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज वेळेत सादर करावेत. त्यांनी पुढे सांगितले की, “पदवीधर मतदारसंघ ही सुशिक्षित समाजघटकाची लोकशाहीतील प्रभावी भूमिका अधोरेखित करणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक पदवीधराने जबाबदार नागरिक म्हणून मतदार नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.”
या अभियानाची माहिती सर्व महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून व्यापक पातळीवर देण्यात येत आहे. तसेच, नागरिकांना ऑनलाईन किंवा तहसील कार्यालयात प्रत्यक्षरित्या अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपली मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here