कुरखेडा : शेतकऱ्याने गळफास घेत संपविली जीवनयात्रा

951

– कुंभीटोला येथील घटना
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ४ एप्रिल : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या कुंभीटोला येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवार ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. देवराम मानकु नैताम (५६) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक देवराव नैताम यांनी ५ एकर शेतामध्ये उन्हाळी धानपीक लावले होते. दरम्यान रोवणी करून दीड महिन्याचा कालावधी लोटून सततच्या भारनियमनामुळे धान्य पिकाला पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकला नाही त्यामुळे शेतात भेगा पडतांना दिसल्या तसेच रोवणी केलेल्या धान्यपिकाला वेळेवर युरिया खत मिळू न शकल्याने ही व्यथा अनेक शेतकऱ्यांकडे मांडली. घरी लग्नाची मुलगी आणि एक दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलाला कामानिमित्त कुरखेडा ला पाठवून देवराव नैताम यांनी घरातून दोर घेत शेतावर जाऊन जवळ कोणीही नसल्याचे बघून झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती गावातील नागरिकांना होताच घटनास्थळी धाव घेत याबाबत कुरखेडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतक देवराव नैताम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली आहे. सदर घटनेने नैताम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर भरनियमनाचा फटका व युरिया खत न मिळाल्याने नापिकी होणार या विवंचनेत शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे लोकचर्चेतून समोर येत आहे. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

(The gadvishva) (the gdv) (kurkheda kumbhitola) (devrao naitam)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here